हर्षवर्धन पाटील यांच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी.

हर्षवर्धन पाटील यांच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी.

जितेंद्र जाधव 

इंदापूर/ प्रतिनिधी:-

आज राज्याचे माजी मंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते व राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा भाग्यश्री बंगलो या ठिकाणी जनता दरबार झाला. या जनता दरबाराला इंदापूर तालुक्यासह, शेजारील  तालुक्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.सकाळी ८ वाजता सुरू झालेला जनता दरबार दुपारी १ वाजेपर्यंत चालू होता.

हर्षवर्धन पाटील यांनी आज घेतलेल्या जनता दरबारामध्ये प्रामुख्याने इंदापूर तालुक्यामध्ये सध्या भीषण दुष्काळाचे सावटाने निर्माण झालेल्या अडचणी, पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंतची पाणीटंचाई, वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे शेतीचे प्रश्न, विद्यार्थ्यांसमोरील अडचणी तसेच इंदापूर तालुक्यातील प्रशासकीय पातळीवरील प्रमुख अडचणी तात्काळ सोडवण्यात आल्या. 

आज झालेल्या जनता दरबाराला इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. विविध समस्या वरती हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून तात्काळ मार्ग निघाल्याने लोकांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण होते.

Comments

Popular posts from this blog

गोतोंडी गावातील राष्ट्रवादीतील दोन गटात पैकी एक गट भाजपाच्या वाटेवर..

इंदापूर पोलीसांकडून अवैध देशी दारू भट्टीवर कारवाई..

युवकांचा बुलंद आवाज कर्मयोगी चे संचालक मा.श्री रवींद्र (शेठ)सरडे यांचा आज वाढदिवस....!!