विधानसभा निवडणुकी अगोदर अंकिता पाटील-ठाकरे ॲक्शन मोडवर.
विधानसभा निवडणुकी अगोदर अंकिता पाटील-ठाकरे ॲक्शन मोडवर.....!!
गावो-गावी कार्यकर्त्यांच्या भेटी आणि दौऱ्यांचा वेग वाढला.
जितेंद्र जाधव
इंदापूर/ प्रतिनिधी:-
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. त्यातच इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे या ॲक्शन मूड वर आल्या असून इंदापूर तालुक्यात अंकिता पाटील-ठाकरे यांच्या दौऱ्यांना अधिक गती आली आहे. तर त्यांना गावोगावी कार्यकर्त्यांकडून मोठे पाठबळ मिळत असताना दिसत आहे.
अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघ माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी पिंजून काढला आहे. त्यांनी गावोगावी कार्यकर्त्याशी असणारा संपर्क व भेटीगाठी यावरती अधिक भर दिल्याचे सध्यातरी दिसत आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाग्यावरती सोडवण्याचा नुसता सपाटाच लावला आहे. तर कार्यकर्त्यांकडून अंकिता पाटील- ठाकरे यांच्या दौऱ्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत असताना दिसत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर इंदापूर मध्ये विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपूर्वी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील हेच विधानसभेवर निवडून येणार व तेच आमदार असणार अशी वल्गना कार्यकर्त्यांकडून होत असेल तशी तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. त्यामुळे यावर्षी इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते पूर्ण ताकतीन उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच इंदापूर तालुक्यातील तरुणांसाठी क्रीडा विभागाच्या विविध विषयांसंदर्भात त्यांनी राज्याचे क्रीडामंत्री बनसोडे यांची नुकतीच भेट घेऊन तालुक्यातील अनेक विद्यार्थी राज्य पातळीवर अनेक क्रीडा प्रकारात त्यांनी नाव कमवले आहे.आता या तरुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. याबाबत क्रीडा विभागा चा निधी इंदापूर तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी केली आहे.

Comments
Post a Comment