इंदापूर मध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा सभेचे रणसिंग फुंकले.
इंदापूर मध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा सभेचे रणसिंग फुंकले....!!
यंदा विधानसभेवर हर्षवर्धन पाटील यांना मताधिक्याने निवडणूक द्यायचे....!!
जितेंद्र जाधव
इंदापूर/ प्रतिनिधी:-
आज इंदापूर मध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची बैठक भाजप कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रणसिंग फुंकले असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप नेते,माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेमध्ये पाठवायचे असा विश्वास या बैठकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त करत कामाला सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते इंदापूर मधील भाजप कार्यालयात एकत्र आले. या कार्यकर्त्यांनी सदरची बैठक विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून या निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना विधिमंडळात पाठवायचे ही खुणगाठ मनामध्ये ठेवून भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
या अगोदर भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक कामे करण्यात आली. तसेच विविध उपक्रमाच्या आयोजन करून विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना मदत करण्याचे काम युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले होते. प्रत्येक कामात अग्रेसर असलेले युवा मोर्चाचे कार्यकर्ते यावेळी ऍक्टिव्ह झाल्याचे दिसत असून विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ते पूर्ण ताकतीने कामाला लागले आहेत.

Comments
Post a Comment