युवकांचा बुलंद आवाज कर्मयोगी चे संचालक मा.श्री रवींद्र (शेठ)सरडे यांचा आज वाढदिवस....!!

युवकांचा बुलंद आवाज कर्मयोगी चे संचालक मा.श्री रवींद्र (शेठ)सरडे यांचा आज वाढदिवस....!!

इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी या छोट्या गावांमध्ये जन्मलेले आणि लहानपणापासून राजकारण व समाजकारणाचा बाळकडू मिळालेले युवा नेतृत्व म्हणजे मा.श्री रवींद्र (शेठ )सरडे यांचा आज वाढदिवस.

रवींद्र(शेठ)सरडे यांचे वडील ज्येष्ठ नेते मा.श्री वामनराव(तात्या) सरडे हे कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे अनेक वर्ष संचालक होते तसेच ते उजनी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांच्याकडूनच त्यांच्या मुलाला म्हणजेच युवा नेते कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मा श्री रवींद्र (शेठ) सरडे यांना राजकारणाचा बाळकडू मिळाला.

 काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा *गंगाधारेसारखे संत वहातात* अवघा इंदापुर तालुका व उजनी पट्ट्याला *चिंब* करणारा एक युवा नेता जर कोण असेल तर, ते युवा नेते *मा.रवींद्र(सेठ) सरडे* होय. शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून रवींद्र (सेठ) सरडे यांची ओळख.

  युवकांच्या हितार्थ निर्णय, पारदर्शकता, कर्तव्यदक्ष, युवासंग्रह,पक्ष संघटनेसाठी केलेले काम आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्यसंपन्नता लाभलेले एक असामान्य नेतृत्व म्हणजेच मा. रवींद्र (शेठ) सरडे होय. 



सुशिक्षित बेरोजगारांच्या चळवळीसाठी व व्यक्तीमत्वासाठी लागणार्‍या पट्टीतील या अनेक निकषांशिवाय संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव,कामगारसेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे *खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते* नेते म्हणजे रवींद्र (शेठ)सरडे होय.

   दुरदृष्टीने झपाटुन काम करणारं गतिमान नेतृत्व! त्यांच्यासोबत काम करतांना वेगळीच उर्जा मिळते. त्यांनी जेंव्हा पासुन ग्रामविकासाची जबाबदारी स्विकारली आहे, त्या प्रत्येक जबाबदारीत सतत जागृत असणार नेतृत्व म्हणजे युवा नेते रवींद्र(शेठ) यांच्यात पाहावयास मिळाले. 

रवींद्र(शेठ) यांच्या बरोबर काम करतांना अनेक अनुभव मिळाले, मार्गदर्शन मिळाले. युवकांचे प्रश्न जाणणारा नेता म्हणुन रवींद्र (शेठ)सरडे यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. कोणतेही काम हातात घेतांना, सुरु करतांना होणारे *फायदे-तोटे, दुरगामी परिणाम* यांचा विचार करुन सखोल अभ्यास करुन कामास सुरुवात करण्याची *खास हातोटी* रवींद्र(शेठ) सरडे यांच्याकडे आहे. याचा अनुभव मी खुप जवळुन घेतला आहे.

  रवींद्र (शेठ) यांनी युवकांच्या व ग्रामविकासाच्या विविध प्रश्नांवर समस्येवर आवाज उठवुन न्याय दिला आहे. युवकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार्‍या, विकासासाठी राजकारण, समाजासाठी समाजकारण, अन्यायाला आळा घालणार्‍या या युवा नेतृत्वाने युवकांच्या ह्रद्यायाच्या सिंहासनावर अढळ स्थान निर्माण केले आहे. या असामान्य नेतृत्वाचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्याचा मी घेतलेला थोडासा आढावा....!!


लेखन/शब्दांकन 

जितेंद्र जाधव

इंदापूर

Comments

Popular posts from this blog

गोतोंडी गावातील राष्ट्रवादीतील दोन गटात पैकी एक गट भाजपाच्या वाटेवर..

इंदापूर पोलीसांकडून अवैध देशी दारू भट्टीवर कारवाई..

युवकांचा बुलंद आवाज कर्मयोगी चे संचालक मा.श्री रवींद्र (शेठ)सरडे यांचा आज वाढदिवस....!!