सराटी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या चौकशीची मागणी.
सराटी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या चौकशीची मागणी.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिली जाणार.
जितेंद्र जाधव
इंदापूर/प्रतिनिधी:-
इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यालय व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित संस्थेची तात्काळ चौकशी करा अशी मागणी इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून तक्रारी अर्जद्वारे करण्यात आली आहे.
इंदापूर तालुक्यात सराटी या गावांमध्ये इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांची जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था आहे. या शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण दिले जात नाही. या संस्थेच्या तत्सम महाविद्यालयात व विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित शिक्षण संस्थेची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी दि.४ रोजी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे व शिक्षण विभागाकडे करण्यात आली करण्यात आली आहे.
संबंधित दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या या विद्यालयात व महाविद्यालयात व्यवस्थित नियोजन व व्यवस्थापन नसल्याने बऱ्याच विषयांचे तास होत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांकडून संपूर्ण फी घेतली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच संबंधित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक भरती करतेवेळी शिक्षकांची ओरिजनल कागदपत्रे जमा करून घेतली जात असल्यामुळे संबंधित शिक्षण संस्थेत कोणताही शिक्षक भीतीपोटी नोकरी करण्यास तयार होत नसल्याने शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
तसेच संबंधित संस्थेच्या महाविद्यालयामध्ये व विद्यालय मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून विद्यालयापर्यंत येण्या- जाण्यासाठी ज्या स्कूल बस वापरल्या जात आहेत. त्या स्कूल बस मध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असून संबंधित स्कूल बस आरटीओ विभागाच्या नियमाप्रमाणे पासिंग केलेल्या नसून त्यांचा इन्शुरन्स भरलेला नाही. कारण या स्कूल बस मध्ये अपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात. जर भविष्यामध्ये एखादी मोठी अडचण निर्माण झाल्यास त्याला संबंधित शिक्षण संस्था जबाबदार असेल असे म्हटले आहे.
या सर्व अडचणीमुळे ग्रामीण भागातील गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. या सर्वस्वी नुकसानाला सदरची शिक्षण संस्था व शिक्षण संस्थेचे चालक जबाबदार असून संबंधित संस्थेची शिक्षण विभागामार्फत तात्काळ चौकशी करून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांना भेटून संबंधित संस्थच्या चौकशीची मागणी केली जाणार...?
सराटी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांवरती होत असलेल्या अन्याय बाबत व शिक्षकांवरील दबाव तंत्राचा वापर होत असल्याने संबंधित शिक्षण संस्थेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी इंदापूर तालुका भाजपा युवा मोर्चाचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना सक्षम भेटून निवेदन दिले जाणार आहे.


Comments
Post a Comment