जननायक, प्रेरणादायी शक्तिपीठ....
जननायक, प्रेरणादायी शक्तिपीठ....!!
महाराष्ट्रातील एक उत्तुंग नेतृत्व, प्रचंड दातृत्व आणि दिव्यत्वाची प्रचिती होय. महाराष्ट्राच्या राजकारणात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते, विकासरत्न,भाजप नेते,माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब होय. अविरत कार्य, जनसेवेचा ध्यास घेऊन चोविस तास जनहितार्थ वाहिलेले जीवन आणि ‘सुसंस्कृत आपला माणुस’ असा सामान्यांना विश्वास असणारे हे खंबीर नेतृत्व आहे.नामदार हर्षवर्धनजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही दिवसांपूर्वीच प्रचंड उलथापालथ झाली. या राजकीय रणनीतीमध्ये कोणती समीकरणे कशी जुळली जातील याचा विचार करून करून सर्वसामान्य माणसाच्या विचार चक्राला ब्रेक लागला होता. अशा राजकीय वातावरणात अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीचे समीकरण जुळवा-जुळवी मध्ये भाजपच्या नेत्यांबरोबर महत्वाचे योगदान नामदार हर्षवर्धन पाटील साहेब यांचे ही आहे.
ज्या मोजक्या नेत्यांची नावे अग्रभागी राहिली त्यातील प्रमुख नाव म्हणजे आपले जननायक , प्रेरणादायी शक्तिपीठ, लाडके नेते, माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील हे होय.महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या विचारांना,अनुभवायला किती महत्त्व हे एक प्रकारे सिद्ध केले आहे. आपल्या प्रचंड,अमोघ अनुभवाने संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घातलेल्या या नेतृत्वाने राजकीय डावपेचातही अग्रेसर राहून राजकीय पटलावरील आपले आढळस्थान सिद्ध केले आहे.
ना. हर्षवर्धनजी पाटील म्हणजे महाराष्ट्रातील एक उत्तुंग नेतृत्व, प्रचंड दातृत्व आणि दिव्यत्वाची प्रचिती असलेले अनुभवी नेते म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील सहकारातील अनुभवी नेते म्हणून स्वकर्तृत्वाने नेतृत्व सिद्ध केलेला सर्व सामान्यांशी पक्की नाळ जोडलेला ‘जननायक’ म्हणजे हर्षवर्धन पाटील हे आहेत. हर्षवर्धनजी पाटील यांचे जीवन म्हणजे इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेला समर्पित केलेले मुर्तीमंत ज्वलंत उदाहरण आहे.
जननायक ना.हर्षवर्धनजी पाटील यांच्या मंत्रिपदाच्या काळात विविध पदांची उंची गाठण्यासाठी चालतांना रस्त्यात अनेक संकटं आली, कधी बलाढ्य प्रस्थापितांच्या विरोधात कडवा संघर्ष करावा लागला तर कधी मनाला दु:ख आणि वेदनांचा चिखल तुडवत पुढे जावे लागले. अनेकदा विरोधकांनी हर्षवर्धन पाटील संपल्याचा कांगावा करत आनंद ही साजरा केला, पण तो फार काळ कधीच टिकू दिला नाही. सर्व मार्गांनी कोंडीत पकडण्याचे प्रयत्न अनेकांनी अनेक प्रकारे केले. पण कर्तृत्वाची नीव एवढी पक्की की सगळ्या संकटांना आणि राजकीय कुरघोड्यांवर मात करून हे आमचं धिरोदात्त नेतृत्व ‘जब जब भी बिखरा हुं,नयी रफ्तार से निखरा हुं’ याप्रमाणे सिद्ध झाल्याचे उभ्या महाराष्ट्राला दिसुन आले आहे.
आज आमचा नेता इंदापूर तालुक्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत आहे. जेव्हा आमच्या या नेत्याचा एक शब्द कार्यकर्ता अंतिम शब्द म्हणून पाळतो तेव्हा आमच्या नेत्याच्या शब्दाला कार्यकर्त्यांच्या हृदयात किती स्थान आहे हे प्रकर्षाने जाणवते. माणूस जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला मदतीची खरी गरज असते. जेव्हा संपूर्ण समाज जेव्हा संकटात असतो तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाच्या मदतीसाठी पुढे येणारी माणसं ही खऱ्या अर्थाने “हिरो”असतात. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जनतेचे खरे हिरो ना. हर्षवर्धनजी पाटील साहेब आहेत.कर्तृत्व त्याच्याच हातून घडत असतं जे ते पार पाडायची इच्छाशक्ती ठेवतात आणि ते पूर्ण करण्यासाठी कठीण रस्त्यावर चालायचं धाडस करतात! थोडक्यात काय तर राजकीय जीवनात मोठं व्हायचं असेल तर थेट लोकांशी घट्ट नाळ जोडावी लागते आणि ती नाळ आमचे नेतृत्व जनतेशी घट्ट जोडून उभे आहे .
लोकाभिमुख काम करणाऱ्या नेतृत्वाला संघर्ष व संकट अटळ असते. पण संघर्षाच्या वाटेवर चालून आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे कौशल्य ज्याला असते तोच लोकमान्य, जननायक,प्रेरणादायी शक्तिपीठ नेता ठरत असतो.राजकीय क्षितिजावरून पाहिले असता देशाच्या व राज्याच्या राजकारणात अगदी थोडकेच नेतृत्व असे दिसतात की ज्यांनी स्वतः अविरत जनतेच्या प्रश्नांसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून आपल्या सततच्या संघर्षातून आपले लोकोपयोगी नेतृत्व उदयास आणले आहे.नामदार. हर्षवर्धनजी पाटील उर्फ भाऊ हे त्यापैकीच एक होय.
एखादी व्यक्ती कितीही मोठी झाली तरी त्यांचे लक्ष नेहमी आपली माती व आपल्या माणसांत लागलेले असते. अशाच प्रकारे ना. हर्षवर्धनजी पाटील हे विकासाचे महामेरू,बहुत जनांसी आधारू बनलेले आहेत. भविष्यात मंदावलेला इंदापूर तालुक्याचा विकास पुन्हा एकदा प्रगतीपथावर जाणार यात तिळमात्र शंका नाही. गोरगरीब, वंचित – उपेक्षितांच्या आयुष्यात उन्नती व विकासाचा रंग भरण्यातच खरे सार्थक आहे हे उद्दिष्ट ठेऊन हर्षवर्धनजी पाटील यांनी वाटचाल केलेली आहे.
ना. हर्षवर्धनजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!! लाडक्या नेत्याला आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा घडो...!!!
लेखन..
श्री.भुषण प्रकाश काळे.
संचालक -कर्मयोगी शंकराव पाटील सहकारी साखर कारखाना.
माजी उपसरपंच-पळसदेव.
अध्यक्ष- पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ-पळसदेव.

Comments
Post a Comment