कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहात बळ देणारा नेता....
कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहात बळ देणारा नेता....!!
राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते.पुणे जिल्ह्यात दिवंगत स्वर्गीय शंकरराव पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले. त्यांचा वारसा राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री, भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते ना. हर्षवर्धनजी पाटील उर्फ भाऊ यांनी जपला आहे.
प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती व जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ना.हर्षवर्धनजी पाटील साहेब पालकमंत्री असताना आलेला महापूराच्या संकटकाळात ते जनतेच्या मदतीला स्वतः धावून गेले होते.
पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात विकासाच्या नवनव्या संकल्पना ते मांडत असतात. सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करत वेगवेगळ्या पदांवरती काम करण्याची संधी दिली . शिवामृत दूध संघाचे संचालक ते राज्याचे सहकार, संसदीय कार्य अशा अनेक मंत्रिपदावर काम करून गरुडझेप घेणाऱ्या नेतृत्वाचा आज वाढदिवस...केवळ जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण केली आहे.
अगदी कमी वयामध्ये राज्याच्या राजकारणात,समाजकारण आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन हे ब्रीद घेऊन ते काम करीत आहेत. शैक्षणिक संस्थेचा डोलारा सांभाळतानाच त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. तत्कालीन महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार, संसदीय कार्य, बाल विकास कल्याण, पणन, सांस्कृतिक अशा विविध खात्यांच्या कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पेलत त्या-त्या खात्याला नावलौकिक मिळवून दिले.
कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम ना. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी केले आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांचे ते आशास्थान बनले आहेत. त्यातूनच आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साक्ष जनतेला पटली आहे. हर्षवर्धनजी पाटील यांच्याकडून जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत. जनतेच्या कसोटीवरही ते यशस्वी ठरो आणि राज्याचे नेतृत्व करो, हीच वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा...
लेखन:-
मा.श्री. रघुनाथ राऊत.
अध्यक्ष-हर्षवर्धन पाटील मोटार वाहतूक संघ.

Comments
Post a Comment