युवकांचा बुलंद आवाज कर्मयोगी चे संचालक मा.श्री रवींद्र (शेठ)सरडे यांचा आज वाढदिवस....!!
इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी या छोट्या गावांमध्ये जन्मलेले आणि लहानपणापासून राजकारण व समाजकारणाचा बाळकडू मिळालेले युवा नेतृत्व म्हणजे मा.श्री रवींद्र (शेठ )सरडे यांचा आज वाढदिवस. रवींद्र(शेठ)सरडे यांचे वडील ज्येष्ठ नेते मा.श्री वामनराव(तात्या) सरडे हे कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे अनेक वर्ष संचालक होते तसेच ते उजनी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांच्याकडूनच त्यांच्या मुलाला म्हणजेच युवा नेते कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मा श्री रवींद्र (शेठ) सरडे यांना राजकारणाचा बाळकडू मिळाला. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा *गंगाधारेसारखे संत वहातात* अवघा इंदापुर तालुका व उजनी पट्ट्याला *चिंब* करणारा एक युवा नेता जर कोण असेल तर, ते युवा नेते *मा.रवींद्र(सेठ) सरडे* होय. शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून रवींद्र (सेठ) सरडे यांची ओळख. युवकांच्या हितार्थ निर्णय, पारदर्शकता, कर्तव्यदक्ष, युवासंग्रह,पक्...